गावाविषयी माहिती
प्रभू श्री रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले चितेगाव हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एक छोटेसे प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ४६१६ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २,नूतन माध्यमिक विद्यालय १ अंगणवाडी केंद्रे ५ व व्यायामशाळा १, अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच NHRDF राष्ट्रीय बागवानी अनुसंधान यांचे मुख्य कार्यालय देखील आहे.तसेच सर्व देवी देवतांचे मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून कोबी, फुलकोबी, ऊस,द्राक्षे, सोयाबीन, कांदा, शिमला मिर्ची व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. नाशिक जिल्यात भाजीपाला उत्पन्न मध्ये चितेगाव गावाचा मोठा वाटा आहे.
चितेगाव ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थींना घरकुल लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत चितेगाव गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. मुख्यमंत्री पेयजल योजना व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
चितेगाव गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
चितेगाव हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर व नाशिक शहरापासून २२ किमी अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ९१५.३३ चौ.कि.मी. असून ग्रामपंचायतीमध्ये ५ वार्ड आहेत. एकूण ५४३ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ४६१६ आहे. त्यामध्ये २४३४ पुरुष व २२७७ महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे. उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८° से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात ७° से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
चितेगाव गाव ऊस व द्राक्षे उत्पादनासाठी संपूर्ण नाशिक जिल्यात प्रसिद्ध आहे.
लोकजीवन
चितेगाव गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून कोबी, फुलकोबी, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
चितेगाव गावाच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
लोकसंख्या
पुरुष
स्त्रिया
एकूण
संस्कृती व परंपरा
चितेगाव गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व अखंड हरीनाम साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे चितेगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
प्रेक्षणीय स्थळे
- ग्रामदैवताचे मंदिर –श्री.भैरवनाथ महाराज मंदिर हे गावातील प्रमुख देवतेचे मंदिर आहे हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी यात्रा, धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
- हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
- महादेव मंदिर – चितेगाव गावामध्ये महादेवाचे पुरातन मंदिर आहे.
- स्मशान भूमी – चितेगाव गावातील स्मशान भूमी हे पंचक्रोशीतील प्रमुख आकर्षण आहे. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे या वैकुंठधाम परिसरास अनोखे आकर्षण आहे.
जवळची गावे
चितेगाव गावाच्या आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे चितेगाव गावाशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.
खेरवाडी , वर्हेदारणा, दारणासांगवी, लालपाडी,चेहडी, शिंपी टाकळी ही चितेगाव गावच्या आसपासची प्रमुख गावे आहेत.
समन्वय कर्मचारी
अ.नं. | नाव | विभाग पद | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|
1. | श्रीमती.विजया रावसाहेब वायकर | ग्रामपंचायत अधिकारी | (+91) 94031 27621 |
2. | श्री. शेखर बाजीराव पाटील | ग्राम महसूल अधिकारी | (+91) 80558 07496 |
3. | श्री.राहुल यादव दळवी | पोलीस पाटील | (+91) 83800 68451 |
4. | श्री. सुरेश प्रकाश गांगोडे | सहाय्यक कृषी अधिकारी | (+91) 98813 15433 |
5. | श्री. माणिक गाडे | कोतवाल | (+91) 98509 69250 |
6. | श्री.गोपीनाथ एकनाथ खरात | ग्रामपंचायत कर्मचारी | (+91) 99219 23576 |
7. | श्री.संदीप दौलत गांगुर्डे | ग्रामपंचायत कर्मचारी | (+91) 96575 11065 |
7. | श्री.अभिषेक ज्ञानेश्वर गाडे | ग्रामपंचायत कर्मचारी | (+91) 86050 94571 |
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले
जन्म नोंद दाखला
मृत्यु नोंद दाखला
विवाह नोंदणी दाखला
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला
निराधार असल्याचा दाखला
नमुना ८ चा उतारा
शिक्षण विभाग
अंगणवाडी विभाग
विद्यार्थी संख्या
अंगणवाडी नाव | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
अंगणवाडी 1 | 21 | 31 | 52 |
अंगणवाडी 2 | 46 | 38 | 84 |
अंगणवाडी 3 | 33 | 31 | 64 |
अंगणवाडी 4 | 41 | 28 | 69 |
अंगणवाडी 5 | 34 | 14 | 48 |
एकूण | 175 | 142 | 317 |
अंगणवाडी सेविका माहिती
नाव | पद नाम | मोबाईल क्रमांक |
---|---|---|
श्रीमती. अलका सुधाकर पवार | अंगणवाडी सेविका | (+91) 70663 12291 |
सौ.वंदना दिलीप बर्वे | अंगणवाडी सेविका | (+91) 90961 73715 |
सौ. संगीता नामदेव लवांड | अंगणवाडी सेविका | (+91) 95523 48574 |
सौ. शारदा नंदकुमार भंबारे | अंगणवाडी सेविका | (+91) 91128 03442 |
सौ. कल्याणी तुकाराम शेलार | अंगणवाडी सेविका | (+91) 70663 75290 |
नलिनी लहू आचारी | अंगणवाडी मदतनीस | (+91) 77458 70496 |
निर्मला सुनील शेलार | अंगणवाडी मदतनीस | (+91) 77984 16278 |
संगीता सुरेश शेजवळ | अंगणवाडी मदतनीस | (+91) 99219 97651 |
सविता नंदू शेलार | अंगणवाडी मदतनीस | (+91) 95458 20779 |
सारिका शांताराम भडके | अंगणवाडी मदतनीस | (+91) 89755 40433 |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितेगाव
विद्यार्थी संख्या
इयत्ता | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
पहिली | 07 | 13 | 20 |
दुसरी | 05 | 05 | 10 |
तिसरी | 10 | 12 | 22 |
चौथी | 05 | 12 | 17 |
एकूण | 36 | 54 | 90 |
शिक्षक माहिती
नाव | मोबाईल क्रमांक |
---|---|
श्रीमती. संगीता मधुकर कानडे | (+91) 94260 94568 |
सौ. रेखा तुळशीराम भुसारे | (+91) 96732 56581 |
सौ. मनीषा लक्ष्मण लाड | (+91) 86986 85351 |
श्री. सचिन श्रीराम काकुस्ते | (+91) 99605 86039 |
सौ. निर्मला जितेंद्र पवार | (+91) 88885 55069 |
श्री. नितीन अशोकराव पाटील | (+91) 70830 50460 |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा
विद्यार्थी संख्या
इयत्ता | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
पहिली | 01 | 06 | 07 |
दुसरी | 00 | 04 | 04 |
तिसरी | 03 | 05 | 08 |
चौथी | 04 | 04 | 08 |
एकूण | 08 | 19 | 27 |
शिक्षक माहिती
नाव | मोबाईल क्रमांक |
---|---|
श्री. शरद रंगनाथ ससाणे | (+91) 97635 40904 |
श्रीमती. शितल बाळासाहेब गाडे | (+91) 82756 85966 |
आरोग्य विभाग
अ.नं. | नाव | आरोग्य विभाग पद | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|
1. | डॉ. सुजित कोशिरे | तालुका वैद्यकीय अधिकारी | (+91) 94227 57565 |
2. | डॉ. इंजल चव्हाण | पी.एच.सी. वैद्यकीय अधिकारी | (+91) 77588 05330 |
3. | डॉ. प्रियंका साबळे | उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी | (+91) 84840 54403 |
4. | श्री. हेमंत भुईटे | आरोग्य सेवक | (+91) 76200 56218 |
5. | सौ. सी.ए. गोसावी | आरोग्य सेविका | (+91) 90119 47386 |
6. | सौ. स्वाती बाकेराव भंबारे | आरोग्य सेविका | (+91) 99217 11768 |
7. | सौ. सारिका कैलास शेलार | आशा वर्कर | (+91) 86944 79190 |
7. | सौ. ललिता प्रशांत पवार | आशा वर्कर | (+91) 94234 95771 |
7. | सौ. छाया रतन शेलार | आशा वर्कर | (+91) 99217 36210 |